बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा परिसरात असलेल्या मातोश्री वॉशिंग सेंटर जवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती पाटोदा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पाटोदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आहे. याचा पुढील तपास पाठवता पोलीस करत आहेत.