पनवेल: कळंबोली मधील भारतीय जनता पक्षात शिवसेना उबाठा गटातील महिलांचा भव्य प्रवेश
Panvel, Raigad | Oct 17, 2025 अमरदीप सोसायटी आणि कळंबोली परिसरातील असंख्य जागरूक आणि राष्ट्रभक्त महिलानी आज शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास शिवसेना (उबाठा गट) सोडून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रेरणादायी प्रवेश सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कलंबोली शहर मंडल अध्यक्ष अमर पाटील, शहर सचिव मनीष तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नमाला शिंदे व दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींनी घेतलेला हा निर्णय पक्षासाठी मोठी ताकद सिद्ध होणार आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे बळ अधिक मजबूत झाले असून, महिला भगिनींनी कमळ फुलविण्याचा निर्धार व्यक्त करत नवसंघटनेचा संदेश दिला आहे.