नागपूर शहर: आंतरराज्यीय चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त: दिलीप चंदन पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांनी 3 जून ला दुपारी 4:30 ला दिलेल्या माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने एका आंतरराज्यीय टोळीच्या ३ सदस्यांना अटक केली आहे. गणेशपेठ येथील एका गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या या आरोपींकडून २२ लाख १९ हजार ५०० रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी भुसावळ येथे चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी जळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.