देऊळगाव राजा: ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे कार्तिक दीपोत्सवास प्रारंभ - रात्री १२वाजता श्री मंदिरा मध्ये-हरि हर भेट सोहळा संपन्न
देऊळगाव राजा - शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे कार्तिक मंडप उत्सवात प्रारंभ झाला असून दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री मंदिरा समोर दीपोत्सवास प्रारंभ झाला आहे . रात्री १२ वाजता मंदिरामध्ये हरिहर भेट सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी महाआरती झाली .श्री बालाजी संस्थांनचे वंशपरंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती