जालना: दावलवाडी शिवार महिको कंपनी समोर पोलीस वाहनाला धडकली भरधाव बस ,पोलीस कर्मचारी व बस मधील प्रवासी जखमी
Jalna, Jalna | Sep 8, 2026 आज दिनांक 8 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील दावलवाडी शिवारात असलेल्या महिको कंपनी समोर जालना छत्रपती संभाजी नगर या मुख्य मार्गावर जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर कर्मचारी एका घटनेचा पंचनामा करत असताना छत्रपती संभाजी नगरच्या दिशेवरून जालन्याच्या दिशेने जाणारी बस त्यांच्या वाहनाला धडकली आहे,यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी इतर कर्मचारी उपास मध्ये प्रवासी जखमी झाल्या असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.