मानगाव: बहिणीच्या प्रियकराच्या खून; आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा
Mangaon, Raigad | Apr 10, 2026 बहिणीच्या प्रियकराच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माणगाव न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ही घटना माणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संत निरंकारी सत्संग भवनसमोर 11 ऑगस्ट 2018 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनेची हकीकत अशी की, सौरभ उर्फ बेंडया हरिश्चंद्र सावंत याच्या बहिणीसमवेत विशाल उर्फ बाळू उर्फ भिम श्रीपत जुमारे याचे प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधाबाबत सौरभला समजले. त्याबाबतची विचारणा करण्यासाठी तो माणगाव येथील संत निरंकारी हॉलमध्ये आला. तेथे विशाल जुमारे हा मित्रांसोबत बसलेला होता.