शहरातील खाडगाव रोड परिसरामध्ये रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण झाली. पीव्हीआर चौक ते खडगाव समशानभूमीपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रात्रीची वेळ, बाजारपेठ बंद होण्याची घाई आणि कामावरून घरी परतणारी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती रिंग रोडवर दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा तयार झाल्या. अनेक नागरिक, महिला व ज्येष्ठांनीही तासभर अडकून पडल्याने नाराजी व्यक्त केली.