नागपूर शहर: वाहन चोरी विरोधी पथकाने वाहन चोरीचा पर्दाफाश; २ अल्पवयीन ताब्यात, ५ दुचाकी जप्त
16 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या आहेत.गिट्टीखदान परिसरातून चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या तपासादरम्यान ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. चौकशीत त्यांनी गिट्टीखदान, मानकापूर आणि अंबाझरी परिसरातून वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अध