आज नाशिकमध्ये लाचखोरीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला थेट लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक दिनेश झुंजारे यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी करण्यात आली. तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाचेची रक्कम