नागपूर शहर: कार्यालय फोडणारे दोन सराईत चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त: ज्ञानेश्वर भेदोडकर पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 7 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूर: सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'वेद फर्च्युन व्हिजन' या रिअल इस्टेटच्या कार्यालयात झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात नागपूर गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली आहे.