नागपूर शहर: मनपा स्वीकृत सदस्य निवड: काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह;नितीन राऊत यांचा प्रक्रियेवर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आक्षेप
नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेवरून शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी या प्रक्रियेत आपल्याला डावलले गेल्याचा गंभीर आरोप केला असून, निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांसोबतच आता काँग्रेसमधील गटबाजीची चर्चा रंगली आहे.