नागपूर शहर: धक्कादायक : ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, 60 वर्षीय नराधम अटकेत
भांडेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका ६० वर्षीय नराधमाने ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपी विजय नागव याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी घराच्या जवळ खेळत असताना आरोपीने तिला बोलावून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.