अलिबाग: खाडीपट्ट्यात जल जीवन मिशनची कामे प्रगतीपथावर
Alibag, Raigad | Jun 2, 2026 ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन ही प्रभावी योजना राबविण्यात आली. सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या मात्र सद्या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु असून जवळजवळ 60 टक्के काम पूर्णत्वाला गेले असल्याचा दावा संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांनी केला असून काम पूर्ण झालेल्या गावांची यादी देखील हाती लागली आहे. ग्रामीण जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी घरगुती नळाद्वारे उपलब्ध व्हावे या चांगल्या हेतून ही योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.