नागपूर शहर: आयपीएल सट्टेबाजीचा अड्डा उद्ध्वस्त; ७ जणांना अटक : राहुल माकणीकर पोलीस उपायुक्त
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी 25 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,सदर बाजार अपार्टमेंटमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सट्टा खेळणाऱ्या ७ आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपीकडून लॅपटॉप मोबाईल याच्यासह लाख रुपयांचा मुद्दे मालही जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे.सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.