चारचाकी वाहनातील अज्ञात इसमानी सिनेस्टाईल पाठलाग करत धावत्या स्कार्पिओवर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवार १६ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गंगाखेड परभणी मार्गावरील गोदावरी नदी पुल ते गगाखेड शहराजवळील एका बार समोर घडली. या प्रकरणी अक्षय नाना सोणवलकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात स्कार्पिओ चारचाकी वाहनातील अज्ञात इसमांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवार 17 डिसेंबर रोजी रात्री 8 10 वाजता गुन्हा दाखल.