साक्रीत पोलीस ठाण्याजवळ एक बिबट्या उभा असल्याचा फोटो आज शुक्रवारी सकाळपासून प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे शहरात बिबट्याचा संचार असल्याच्या भीतीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत वनविभागाने सदर फोटो हा एआय निर्मित व बनावट असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहनही केले आहे.