कंधार: कंधार शहरात 20 लाखाच्या हायवा टिप्परमध्ये 20 हजार किमतीची 4 ब्रास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोघांवर कंधार पोलीसात गुन्हा
Kandhar, Nanded | Nov 19, 2025 कंधार शहरात दि 17 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 23:50 चे सुमारास यातील आरोपी 1.उनकेश्वर मोरे 2. गुलाब मोरे यांनी त्यांचे ताब्यातील हायवा टिपर क्रं.एमएच 23 एयु 6575 किमत 20 लाख यामध्ये 4 ब्रास रेती किंमत 20 हजाराचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डिकळे करीत आहेत.