नागपूर शहर: नागपूर DRI कडून आंतरराष्ट्रीय पॅंगोलिन तस्करीचा पर्दाफाश; 16.528 किलो खवले जप्त
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे सापळा रचून भारतीय खवले मांजर च्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.आरोपीकडून १६ किलो ५२८ ग्रॅम वजनाचे पॅंगोलिनचे खवले जप्त करण्यात आले.याप्रकरणी तीन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक केलेले आरोपी आणि जप्त केलेले खवले पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जगदलपूर वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.