मुरुड: शिवसेना उबाठा मुरूड शहर प्रमुख पदी आदेश दांडेकर यांची निवड
Murud, Raigad | Jul 20, 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुरूड शहर प्रमुख पदी पुन्हा एकदा आदेश दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. मुरूड तालुका शिवसेना उबाठा पक्षाची बैठक रविवारी सकाळी अकरा वाजता पार पडली. यावेळी ही निवड एकमताने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती प्रमोद भायदे, माजी शहरप्रमुख प्रशांत कासेकर, कुणाल सतविडकर, मोहन पाटील, चंद्रकांत अपराध, मोरे, उमरोटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.