मालेगाव: मालेगाव कॅम्पातील प्रेरणा कॉलनीत साडे १० लाखाची घरफोडी
मालेगाव कॅम्पातील प्रेरणा कॉलनीत साडे १० लाखाची घरफोडी मालेगाव कॅम्प भागातील प्रेरणा कॉलनी, टि.व्ही. सेंटर रोड, येथे काल दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त रमेश सहादू खैरनार (६३) यांच्या घराचा मागील उघडा असलेल्या दरवाजातून आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने बेडरूम मधील कपाट उघडून कपाटातील ८ लाख किमतीच्या ६ नग सोन्याच्या बांगड्या, १ लाख किमतीची सोन्याची चैन, ५० हजारा ची सोन्याची अंगठी, १ लाख किमतीचा गळ्यातील सोन्याचा हार असा एकूण १० लाख ५० हजाराचा ऐवज चोरला.