औंढा नागनाथ: तालुक्यात 'स्क्रब टायफस' या जीवघेण्या आजाराचा शिरकाव;शहरातील उदगीरे हॉस्पिटल येथे रुग्णावर उपचार सुरू
औंढा नागनाथ शहरात नव्या आजाराने आरोग्य यंत्रणेत चिंता निर्माण केली आहे पुणे,नागपूर छत्रपती संभाजी नगर सारख्या शहरानंतर आता स्क्रब टायफस हा आजार औंढा नागनाथ तालुक्यातही आढळून आला असून औंढा नागनाथ शहरातील उदगीरे हॉस्पिटल येथे त्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. ताप येणे डोकेदुखी, मळमळ, उलट्या होत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा व डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत असे आवाहन उदगिरे हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर नागेश उदगिरे यांनी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान केले आहे