लोहारा: धानोरी नंदी पाटी रस्त्यावर पवनचक्की कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना मारहाण
पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीस वापरायचा असेल तर पैसे दया म्हणत कार्यलयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत हातात दगड काठ्या घेऊन जमावाने मारहाण केली.पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता ही वापरायचा नाही वाहन अडवून प्रत्येक वाहनाकडून घेतले जात होते पैसे मारहाण झालेल्यांचा आरोप आहे.