नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रब्बी हंगामातील शेती पिके संकटात सापडली असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पाणी असतांना पिकाला पाणी देता येत नाही . म्हणूनच आज ८ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना माजी जिल्हा प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देऊन तीन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला..