नागपूर शहर: नागपुरात रंगला 'झालमुडी महोत्सव'; शेफ विष्णू मनोहर यांचा आगळावेगळा उपक्रम ;राजकीय विजयाचा खाद्योत्सव
पश्चिम बंगालमध्ये सुमारे सहा दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येत आहे. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, नागपूरचे प्रसिद्ध शेफ **विष्णू मनोहर** यांच्या वतीने नागपुरात एका खास **'झालमुडी महोत्सवा'चे** आयोजन करण्यात आले .पंतप्रधान **नरेंद्र मोदी** यांनी त्यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान स्थानिक झालमुडीची चव चाखली होती आणि तिचे कौतुकही केले होते.