तुमसर तालुक्यातील जि. प. हायस्कूल चुल्हाड येथे आज दि. 16 जानेवारी रोज शुक्रवारला दुपारी 12 वा. तुमसर पं. स. उपसभापती सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. सदस्य राजेंद्र ढबाले यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी सरपंच चंदा कंठीलाल ठाकरे, उपसरपंच डॉ. रमेश पारधी यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.