निवडणूक हेराफेरीविरुद्ध लढा सुरूच राहणार : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
२०२४ च्या महाराष्ट्र निवडणुकीतील विसंगतींविरुद्ध दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, हा लढा संपलेला नाही. बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये झालेल्या हेराफेरीविरुद्ध आवाज उठवत राहू, असे सांगत लोकशाही वाचवण्याची लढाई कधीही थांबणार नाही, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.