नागपूर शहर: मेलोडी खाओ,खुद जान जाओ ; वाढत्या महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. तेल, गॅस, डिझेल आणि पेट्रोल अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे आणि अनोखे आंदोलन