नागपूर शहर: सिद्धेश्वरी झोपडपट्टीत २० दिवसांपासून अंधार; भीषण उष्णतेने तरुणीचा मृत्यू, नागरिकांचा महावितरण वर हल्लाबोल
गेल्या २० दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सिद्धेश्वरी झोपडपट्टी भागात भीषण उष्णतेने एका २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या या तीव्र निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि समाजसेवकांनी आज महावितरण कार्यालयावर चपला दाखवत तीव्र निदर्शने केली.