जालना: जालना हे संतांची भूमी; शहराचे नाव ‘जनकपुर’ करावे – समाजसेवक गणेश सुपारकर यांची मागणी
Jalna, Jalna | Mar 29, 2026 आज दिनांक 29 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. कुडलिका नदीच्या काठावर वसलेले हे शहर ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले आहे. जालना शहरातून अनेक संत-महंत होऊन गेले असून, या भूमीला आध्यात्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. इतिहासातही जालना शहराला विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जालना येथील किल्ल्यावर एक दिवस मुक्काम केल्याची ऐतिहासिक नोंद असल्याचे सांगितले जाते. या सर्व ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पा