खंडाळा: शिरवळ परिसरातील उद्योगांना आणि कारखानदारांना मिळणार पोलिसांची मदत; त्रास देणाऱ्यांवर होणार थेट कारवाई, सांगावीत बैठक
सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिरवळ परिसरातील उद्योग व्यवसायिकांना पूर्णपणे संरक्षण दिले जाईल. त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार करावी, जेणेकरून कारवाईमध्ये अडचण येणार नाही, अशी माहिती फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार खांबे यांनी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगवी येथे बैठक झाली.