सेनगाव: माजी आमदार गोरेगांवकर यांचा 14 ऑक्टोंबर रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश, गोरेगांव येथील बैठकीत घेतला निर्णय
हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर हे दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने आज माजी आमदार गोरेगांवकर यांच्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक गोरेगांव या ठिकाणी संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेवुन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. यावेळी गोरेगांवकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.