नागपूर शहर: पोलिसांविरुद्ध भ्रामक व्हिडिओ पसरवणाऱ्या रॅपिडो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 1 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन पोलिसांनी सोशल मीडियावर पोलिसांविरुद्ध दिशाभूल करणारे व्हिडिओ पसरवणाऱ्या ईशांत घोडेस्वार या रॅपिडो चालकावर कारवाई केली आहे. आरोपीने पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचा निषेध करत निराधार आरोप केले होते. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.