महागाव तालुक्यातील भांब शेत शिवारातील एका शेतात वेचून ठेवलेला सुमारे ५ क्विंटल कापूस अंदाजे किंमत ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी फिर्यादी शेतकरी सविता ब्रमा चव्हाण (वय ४०, रा. भांब) यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे दि. १८ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.