नागपूर शहर: नागपूरमधील पारडी पोलीस ठाण्यात लाखोची फसवणूक; जमिनीच्या नावाखाली ११ जणांना गंडा : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 29 जुलै ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट विकण्याच्या नावावर लाखोंची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पारडी पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शहरातील इतरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.