अकोट: मानसिक त्रास,छळास कंटाळून जावयाची आत्महत्या,५आरोपींचा अटकपुर्व जमानत अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला
पत्नीच्या माहेरच्या लोकांनी मानसिक त्रास दिला म्हणून तेल्हारा येथील एका जावयाने काही दिवसांपूर्वी ह्या मंडळीच्या मानसिक छळास कंटाळून पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातील आरोपी पत्नी,सासु व सासरे यांच्यासह पाचही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.तेल्हारा पो.स्टे येथे याप्रकरणी अपराध नं३५७/२०२५, कलम १०८,३(५) भान्यासं मधील पाचही आरोपींचा अटकपुर्व जमानत अर्ज फेटाळला या प्रकरणी तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.