लातूर: “सरफरोशी की तमन्ना…” आमदार अमित देशमुखांचा व्हायरल डायलॉग; प्रचाराला मिळाली धार
Latur, Latur | Nov 30, 2025 नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात धडक प्रचार करत असताना लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांचा एक दमदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सभेमध्ये त्यांनी प्रसिद्ध कडवे “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है” उच्चारत विरोधकांवर थेट शब्दप्रहार केला.