अलिबाग: रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस पावले
Alibag, Raigad | May 4, 2026 रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यापक आणि ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार शिक्षण समितीचे सभापती चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासोबतच शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील राजिप शाळेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.