गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून जळगावात तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे थंडीची तीव्रता वाढत आहे. हवामान तज्ञांनी येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरून आठ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. वाढलेल्या गारठ्यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली याबाबत आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता माध्यमांना माहिती प्राप्त झाली आहे