नागपूर शहर: अमरावती रोडवरील LIT कॉलेज परिसरात सापडले नवजात अर्भक: विनोद गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 8 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती रोडवरील एलआयटी कॉलेजच्या बांधकाम सुरू असलेल्या परिसरात एका नवजात अर्भकाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तात्काळ अर्भकाला सुरक्षितरित्या उचलून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी दिली आहे.