नागपूर शहर: नोकरीचे आमिष दाखवून ७५ हजारांची फसवणूक; यशोधरा नगर पोलिसांत गुन्हा दाखल: संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 2 मेला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा यशोधरा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोंदिया येथील रहिवासी तपेश बोपचे यांना हिंदुजा कंपनी आणि महानगरपालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी ७५ हजार रुपयांना गंडा घातला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.