जालना: चक्क तहसिलदाराच्या टेबलवर सोडल्या कोंबड्या; सिरसवाडीतील गट क्रमांक 5 मध्ये अवैध उत्खननाचा आरोप
Jalna, Jalna | Sep 30, 2026 जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील गट क्रमांक 5 मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन, तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा तसेच वीज चोरी सुरू असल्याचा दावा सिरसवाडीचे रविंद्र ढगे यांनी केला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुनही कारवाई होत नसल्याने त्यांनी आज चक्क तहसिल कार्यालयात जावून तहसिलदार यांच्या टेबलवर आणि दालनात कोंबड्या सोडून तीव्र आंदोलन केलं. बुधवार दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा.