कल्याण: कल्याण मध्ये दोन गटात पुन्हा तुफान राडा, एकमेकांच्या डोक्यात फोडल्या कुंड्या, व्हिडिओ व्हायरल
Kalyan, Thane | Oct 24, 2025 कल्याण मध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सातत्याने हाणामारी दोन गटात भांडणे,चाकू हल्ला अशा घटनेचे व्हिडिओ समोर येत आहेत. अशीच घटना कल्याणच्या चिकनघर परिसरात घडली आहे. फटाके फोडण्यास विरोध केला म्हणून दोन गटात र*** झाला आणि एकमेकांच्या डोक्यात कुंड्या फोडून लहान कडेवर घेतलेल्या महिलांना देखील धक्काबुक्की करत एकमेकांना मारहाण करण्यात आली. प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे