जालना: चंदनझीरा पोलीसांचा छापा; चंदनझीरा भागातील सुंदर नगर भागात घरातून गोवंशाचे मांस जप्त; 8 किलो मांस जप्त
Jalna, Jalna | Oct 2, 2026 जालना शहरातील चंदनझीरा भागातील सुंदरनगर परिसरात एका घरातून गोवंशाचे मांस विक्री होत असल्याची माहिती डायल 112 वर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे चंदनझिरा पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून सुमारे 8 किलो मांस जप्त केले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुंदरनगर, चंदनझिरा परिसरातील एका घरात गोवंशाचे मांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई केली.