अलिबाग: पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रायगडला 52 कोटींचा निधी
Alibag, Raigad | May 20, 2026 रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत 2025-26 या वर्षाकरीता स्थानिक स्वाराज्य संस्थांना वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यास उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींच्या अनुमोदनानंतर मंजुरी देण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रायगड जिल्ह्याला 52 कोटींचा 72 लाख 80 हजार 990 रुपये निधी प्राप्त झाला आहे.