नागपूर शहर: धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण गुन्हा दाखल : रमेश खुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी 23 जूनला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सक्करदरा परिसरातील एका मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूल उलूम फैजाने ताज मदरशातील मौलवी अताय रसूल ऊर्फ तालिब याच्यावर सक्करदरा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी दिली आहे.