अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नुकत्याच्या निवडणुका पार पडल्या,त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजी अविनाश गायगोले यांचा विजय मिळविला होता.त्यांचा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज दुपारी १ वाजता नगर परिषद येथील सुरेशचंद्र भावे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नववर्षाच्या सुरवातीला नव्या घडामोडीला सुरुवात झाली असून नगरपरिषदेला नववर्षात नवे नेतृत्व मिळाले आहे.नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी आज आपला पदभार स्वीकारला