नागपूर शहर: महाजेनकोला हक्काची कोळसा खाण; विजेचे दर कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
राज्याच्या वीज निर्मिती क्षेत्रात मैलाचा दगड ठरणाऱ्या छत्तीसगडमधील 'गरे पाल्मा' कोळसा खाणीतून कोळसा मिळण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत, यामुळे भविष्यात विजेचे दर कमी होण्यास मदत होईल आणि कोळशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.