लातूर: भ्रष्टाचार व दादागिरी विरोधात परिवहन कार्यालय समोर जिल्हा युवा मोटार मालक संघाचे जनताच मालक! भावेंच्या हाकेत आंदोलन सुरु
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर :लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाढता भ्रष्टाचार, मनमानी कारभार व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघ आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी, लातूर यांच्या वतीने आज दिनांक 15 सप्टेंबर सकाळी साडेअकरा वाजल्यापासून पासून बाभळगाव रोडवरील लातूरच्या परिवहन कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू झाले. असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप अशोकराव पाटील व उपाध्यक्ष इनायत सय्यद व सचिव विलास लंगर यांनी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली