नागपूर शहर: नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’: एम.डी. पावडरसह तरुण अटकेत : बाबूराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 25 एप्रिलला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पाचपांवली पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.कमाल चौक परिसरात सापळा रचून नितेश संजय हेडाऊ याला १०.५० ग्रॅम एम.डी. पावडरसह अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.