लकडगंज पोलिसांनी लुट गंभीर प्रकरणाचा अवघ्या ६ तासांत छडा लावला आहे. कुलदीप किशन सिंह ठाकुर याला ऑटोत बसवून मारहाण करत लुटणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला इलेक्ट्रिक ऑटो आणि लुटलेला १००% मुद्देमाल जप्त केला आहे.